घनदाट अरण्यामध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्यावर 6 जुलै रोजी चिरेखणी येथे एका हस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात मलाप्पा हणबर हे जखमी झाले त्यानंतर त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
त्यानंतर ते बरे होऊन घरी परतल्यानंतर याची माहिती मिळताच भाजप नेते ए दिलीप कुमार यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याकरिता आर्थिक मदत देऊ केली.
यावेळी भाजप नेते ए दिलीप कुमार यांनी त्यांच्या कुटुंबियांची आणि मलाप्पा हणबर यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या पुढील उपचाराकरिता कोणतीही मदत हवी असल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.