सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक मार्केट आयोजित व बेळगाव जिल्हा शरिरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रावसाहेब गोगटे स्मृती सहाव्या टॉप टेन करेला स्पर्धा शुक्रवार दि. २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. घेण्यात येणार आहे. टॉप टेन करेला स्पर्धेत पहिल्या १० विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार तर शेवटच्या सात बक्षिसांना प्रत्येकी १ हजार रूपये चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. इच्छुक करेलापटूंनी आपली नावे २ सप्टेंबर रोजी सकाळी १० पर्यंत नोंदवावीत. अधिक माहितीसाठी अजित सिद्दण्णावर झेंडा चौक व सुनिल राऊत, हेमंत हावळ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष अमित किल्लेकर यांनी केले आहेत.
रावसाहेब गोगटे स्मृती स्पर्धा 2 सप्टेंबरला
By Akshata Naik
Previous articleअस्वलाने हल्ला केलेल्या व्यक्तीला ए दिलीप कुमार यांची मदत
Next articleडिझेल चोरी प्रकरणी जोडगोळीला अटक