सौंदत्ती पोलिसांची कारवाई
रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ट्रक मधून डिझेल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करण्यात सौंदती पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दि. 14 ऑगस्ट रोजी सौंदत्ती तालुक्याच्या यड्रावी गावातील मल्लिकार्जुन हे स्वतःचा ट्रक सौंदत्ती धारवाड बायपास रस्त्याच्या बाजूला थांबून झोपलेले असताना ट्रकच्या डिझेल टाकीतून सुमारे 400 लिटर डिझेल चोरीला गेले होते. याप्रकरणी मल्लिकार्जुन यांनी सौंदती पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याने विरुद्ध तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनुसार रामदुर्गचे डीवायएसपी रमणगौडा हट्टी, पोलीस निरीक्षक करुणेशगौडा जे, पोलीस उपनिरीक्षक शिवानंद गुडागनट्टी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी रात्री उशिरा रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीत पाईप टाकून डिझेल चोरल्याची कबुली दिली. या कारवाईत कार, डबा, पाईप, चोरीसाठी वापरलेली हत्यारे याच्यासह 6 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सौंदत्ती पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.संजीव पाटील यांनी कौतुक केले आहे.