देवस्थानच्या जागेवरून गौंडवाड येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. याप्रकरणी काकती पोलीस स्थानकामध्ये अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामधील १८ जणांना जामीन मंजूर केला आहे. काकतीस्थानकामध्ये पोलीस याप्रकरणी १४३, १४७, १४८, ३०७, ४३६, ४२७, ५०४ सहकलम १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील काही संशयितांनी जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन या सर्वांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
यांना झाला जमीन मंजूर
By Akshata Naik
Previous articleडिझेल चोरी प्रकरणी जोडगोळीला अटक
Next articleजायंट्स सखी स्वयंसिद्धा पुरस्कार यांना प्रदान