महिलांमधील सचोटी,उद्योजकता तसेच त्यांच्या कार्यतत्परतेला प्रोत्साहन देण्यासाठी जायंट्स सखीचा आणखी एक उपक्रम.
जायंट्स सखी ही २०१८ पासून महिला सक्षमीकरण आणि बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेली एक सामाजिक संघटना आहे.
यावर्षीपासून “जायंट्स सखी स्वयंसिद्धा पुरस्कार” हा उत्पादन, सेवा आणि व्यवसाय क्षेत्रात वैयक्तिकरित्या गुंतलेल्या महिलाना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने देण्यात येणार आहे.
दरवर्षी २६ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय महिला समानता दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
यावर्षीचा प्रथम पुरस्कार वैयक्तिकरीत्या स्वतः ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या पिंक ऑटो चालक प्रभा बिशीरोटी यांना देण्यात येणार आहे.
२६ ऑगस्ट२०२२ रोजी सायंकाळी चार वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे असे जायंट्स सखीच्या अध्यक्षा चंद्रा चोपडे आणि सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी कळविले आहे.