बेळगाव शहरातील महिला विद्यालय हायस्कूलच्या खेळाडूंनी सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे कॅम्प झोन विभागाच्या क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले आहे. माध्यमिक विभागामध्ये कु. प्रयुजा गुरव हिने मुलींच्या गटात चॅम्पियनशिप मिळविली असून अनेक विद्यार्थिनींनी खालीलप्रमाणे यश मिळविले आहे. प्राथमिक विभाग- फुलबाग गल्ली व चव्हाट गल्ली विभागात सांघिक खो-खो प्रथम क्रमांक, कबड्डी – द्वितीय क्रमांक, 4X100 रिले – द्वितीय क्रमांक, वैयक्तिक स्पर्धेत 400मी. धावणे – रिया पवार – तृतीय क्रमांक, लांब उडी – स्वरा भोसले प्रथम क्रमांक, व गीतांजली मुतगेकर तृतीय क्रमांक, उंच उडी – गीतांजली मुतगेकर – प्रथम क्रमांक व स्वरा भोसले – द्वितीय क्रमांक, गोळाफेक – श्रेया डोंगरे – द्वितीय क्रमांक माध्यमिक विभाग सांघिक खो-खो- प्रथम क्रमांक, 4X100रिले प्रथम क्रमांक 100मी. धावणे – – मधुरा जाधव प्रथम क्रमांक, प्रयुजा गुरव – द्वितीय क्रमांक, 400 मी. धावणे- मधुरा जाधव – प्रथम क्रमांक, 3 कि.मी. चालणे – समिक्षा शहापूरकर – तृतीय क्रमांक 1500मी. धावणे – आरती कुंडेकर – तृतीय क्रमांक, 3 हजार मी. धावणे कु. श्रेया पोटे , प्रथम क्रमांक, अडथळा शर्यत – प्रयुजा गुरव – प्रथम क्रमांक, अंजली कल्लोळकर-द्वितीय क्रमांक, लांब उडी प्रयुजा गुरव – प्रथम क्रमांक, कॅम्प झोन क्रिकेट संघात कु. श्रेया पोटे व नेहा पोटे यांची निवड करण्यात आली आहे. वरील वैयक्तिक प्रथम, द्वितीय क्रमांक व सांघिक गटांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनीची तालुका स्तरीय क्रीडास्पर्धेतमध्ये निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थिनींना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री भरमा तुपारे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एन. पाटील सरांचे प्रोत्साहन लाभले.
महिला विद्यालय हायस्कूलचे क्रीडाक्षेत्रात अभिनंदनीय सुयश
By Akshata Naik
Previous articleजायंट्स सखी स्वयंसिद्धा पुरस्कार यांना प्रदान