नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नुकत्याच जारी केलेल्या मासिक हवाई वाहतूक अहवालात गेल्या महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये बेळगाव विमानतळावरील प्रवासी वाहतूक 6 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती दिली आहे.
बेळगाव विमानतळावर ऑगस्टमध्ये एकूण अंदाजे 25,603 प्रवाशांची ये-जा केली .या आदी जुलैमधील ती 27,249 च्या तुलनेत 1646 कमी झाल्याचे सांगितले
तसेच विमानतळ प्राधिकरणच्या म्हण्यानुसार मासिक मालवाहतूक 23% कमी झाली आहे. डीजीसीएच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात मालवाहतूक 14.9 टन होती जी जुलैमध्ये 19.22 टन होती.