हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गृहसचिव अरग ज्ञानेंद्र यांना निवेदन.
बेंगळुरू : २००६ला केरळ येथे स्थापना करण्यात आलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) नावाच्या संघटनेचे जाळे आता कर्नाटकासह संपूर्ण देशात पसरले आहे. ही संघटना अनेक देशद्रोही आणि समाजद्रोही कार्ये करत आहे. कर्नाटक राज्यात प्रवीण नेट्टारु, हर्ष, रुद्रेश, शरत मडिवाळ यांसह १५ पेक्षा अधिक हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या प्रकरणाच्या आरोपी सूचीमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) सहभागी आहे. संपूर्ण राज्यात हत्या, दंगा, जातीय विद्वेष, द्वेषाचा प्रचार, आतंकवादी प्रशिक्षण केंद्र चालविणे इत्यादी कारवाया करण्याच्या माध्यमातून राज्यातील कायदा सुव्यवस्थेला अत्यंत अपायकारक झाली आहे. या दृष्टीकोनातून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) वर बंदी घालण्यासाठी तत्परतेने कारवाई करावी म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली आज मान्य गृहसचीव श्री. अरग ज्ञानेंद्र यांना विनंती करण्यात आली. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता श्री. मोहन गौडा, हिंदू नेते श्री. कण्णन, श्री. गोपी के., अधिवक्ता त्यागराज आणि इतर उपस्थित होते.
निवेदनात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा अध्यक्ष अब्दुल रेहमान भारतात बंदी असलेल्या ‘SIMI’ म्हणजे ‘स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ या आतंकवादी संघटनेचा राष्ट्रीय कार्यदर्शी होता. केरळ पोलिसांनी एप्रिल २०१३ला नारत, कण्णुर येथील प्रशिक्षण शिबीरावर धाड घातली आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ३२ कार्यकर्त्यांना अटक केली. देशी बाँब, कोयते, बाँब सिद्ध करायचे कच्चे साहित्य आणि PFI ची पत्रके पोलिसांनी जप्त केली. त्या २१ कार्यकर्त्यांवर (UAPA) च्या अंतर्गत देशविरोधी कारवायांमध्ये भाग घेतल्याचा अपराध नोंदविण्यात आला. एवढेच नव्हे तर गेल्या मासात बिहारच्या PFI च्या कार्यालयावर पोलिसांनी धाड घालताच २०४७च्या आत भारताचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र त्या विषयीचे लिखाण मिळाले. बेंगळुरू केजी हळ्ळी, डीजेहळ्ळी. हुब्बळ्ळी, मंगळुरू, शिवमोग्गा येथे झालेल्या दंग्याच्या प्रकरणात PFI संघटनेचा हात असल्याचा राष्ट्रीय चौकशी आयोगाने आरोप सूचीत उल्लेख केला आहे. २०१२ला केरळ सरकारनेदेखील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविषयी केरळ उच्च न्यायालयात माहिती दिली. त्यात ही संघटना देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत घातक तसेच स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजे SIMI चे पुनरुज्जीवन केल्यासारखे आहे, असे सांगितले. केंद्र शासनाने SIMI ला आतंकवादी संघटना घोषित करून त्यावर बंदी घातली आहे. या संघटनेने विविध आतंकवादी संघटनांशी संपर्क केला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सीपीआयच्या २७ सदस्यांची हत्या करण्यात आली असून ८जणांची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. धार्मिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये १०६ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. यासह ही संघटना अपहरण, दंगा पसरविणे इत्यादी देशद्रोही कृत्यात सहभागी आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य फेसबुकवर आयसीसचे समर्थक असल्याचे उघड झाले आहे. ते हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी, हिजबुल मुजाहिदिन, लष्कर-ए-तोय्बा आणि अल्-कायदा यांच्यादेखील संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. (CAA) विरुद्ध उत्तरप्रदेशात दंगा आणि हिंसाचार याला चिथावणी देण्याच्या प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे १०८ कार्यकर्ते अटकेत आहेत. त्यासाठी उत्तरप्रदेशच्या सरकारने या संघटनेवर बंदी घालण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. या विषयाचे गांभीर्य स्पष्ट करून या पार्श्वभूमीवर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि तिच्याशी संबंधीत सर्व संस्था यांच्यावर त्वरीत बंदी घालून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी यांच्यावर देशद्रोह तसेच आतंकवादी कार्यात सहभागी असल्याच्या कारणावरून अपराध दाखल करून त्यांना अटक करावी. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सर्व कचेर्यांना टाळे ठोकून त्यांची सर्व बँक खाती गोठवावी. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची सखोल चौकशी करून त्यांचे कोणत्या आतंकवादी संघटनेशी संपर्क आहेत, विदेशातून त्यांना मिळणारे धन साहाय्य, त्यामागील षड्यंत्र शोधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे ठासून सांगण्यात आले.
आपला विश्वासु
श्री. मोहन गौडा,
राज्य प्रवक्ता,
हिंदु जनजागृती समिती, कर्नाटक.
संपर्क : ७२०४०८२६०९
……………………………………………………………..