कंग्राळी खुर्द येथील ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या अगसगे क्रॉस जवळ कचरा टाकण्यात आल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
या ठिकाणी अनेक जण कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच ग्रामपंचायतीने देखील सदर कचरा उचलण्याकडे कानाडोळा केला आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सदर समस्या जैसे थे असून येथून ये जा करणे नागरिकांसाठी मुश्किल बनले आहे.
त्यातच भटकी कुत्री अन्नाचा शोधात येथील कचरा रस्त्यावर फेकत असून रस्त्यावर देखील कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला दिसून येत आहे.
त्यामुळे ग्रामपंचायतीने त्वरित या गोष्टीकडे लक्ष देऊन अगसगे क्रॉस कचरामुक्त आणि दुर्गंधी मुक्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.