रेल्वे सुरक्षा आयुक्त, दक्षिण परिमंडळ मंगळवार दिनांक 27 रोजी मिरज-लोंढा मार्गातील देसुर-खानापूर रेल्वे स्थानकांदरम्यान नव्याने टाकलेल्या दुहेरी रेल्वे मार्गाची पाहणी करणार आहेत
मिरज-लोंढा बीजी मार्गाच्या देसूर-खानापूर विभागातील दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर, दक्षिण पश्चिम रेल्वेद्वारे 27 तारखेपासून वेगाच्या चाचण्या घेतल्या जातील.
त्यानंतर पुढे, रेल्वे सुरक्षा आयुक्त, दक्षिण सर्कल यांच्या वैधानिक तपासणीचा भाग म्हणून, 28 रोजी देसुर आणि खानापूर स्थानकांदरम्यान स्पेशल ट्रेनद्वारे स्पीड ट्रायल घेण्यात येईल.
स्पीड ट्रायल दरम्यान, नव्याने घातलेल्या दुहेरीकरण रेल्वे मार्गावर ट्रेन 120 किमी/तास पेक्षा जास्त वेगाने धावेल आणि त्यानंतर या रेल्वे मार्गावर नियमित रेल्वे सेवा सुरू केल्या जातील.
त्यामुळे नागरिकांना या दरम्यानच्या मार्गावर सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे तसेच रेल्वे मार्गावर अतिक्रमण करू नये आणि आपला जीव धोक्यात स्पीड ट्रायल दरम्यान धोक्यात घालू नये असे आवाहन करण्यात आले आहे .