खादरवाडी येथील मराठा मंडळ इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पातळीवरील ज्युडो स्पर्धेमध्ये 3 सुवर्णपदकांसह एकूण 12 पदके हस्तगत करत घवघवीत यश संपादन केले आहे.
जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेमध्ये मराठा मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल खादरवाडीच्या ज्युडोपटूंनी 3 सुवर्णपदकांसह 4 रौप्य आणि 5 कांस्यपदक पटकावली आहेत. त्यामध्ये भुवनेश पाटील, श्रेया पाटील, सेजल पाटील यांचे प्रत्येकी एक सुवर्णपदक, आदित्य सलाम, यश डोंगरे, एमडी कैफ धामणेकर यांचे प्रत्येकी एक रौप्य पदक, तर सुषमा शिंदे, मैझान सौदागर, रितेश शेट्टर, प्रथमेश बस्तवाडकर आणि साहिल नंदगडकर यांच्या प्रत्येकी एक कांस्य पदकाचा समावेश आहे. आदित्य सलाम याने कराटे प्रकारामध्ये देखील चमक दाखवताना रौप्य पदक मिळविले आहे. आता सुवर्णपदक विजेत्या भुवनेश, श्रेया व सेजल यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
उपरोक्त सर्व यशस्वी ज्युडोपटूंना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू व शाळेच्या मुख्याध्यापिका वाणीश्री नायर यांचे प्रोत्साहन तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अतुल शिरोळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.