आंबेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील श्री भाग्यलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटीची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली.
सोसायटीच्या कार्यालयात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन गजानन लक्ष्मण घुंग्रेटकर हे होते. सभेची सुरुवात भगतसिंग हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. संचालक आनंद तुडयेकर यांच्या हस्ते शिवमुर्तीचे पूजन तसेच चेअरमन घुंग्रेटकर व व्हा. चेअरमन सुभाष केदनुरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर सभेला सुरुवात करण्यात आली.
सोसायटीच्या सेक्रेटरी अर्चना बेळगुंदकर यांनी मागील सर्वसाधारण सभेतील ठरावांचे वाचन केले त्याचप्रमाणे सोसायटीच्या ताळेबंद पत्रक आणि नफा विभागणीची माहिती दिली. सोसायटीच्या सभासदांना 12 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून गुणवंत मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोसायटीचे सर्व संचालक, भागधारक, सभासद, पालक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.