सासऱ्याने अर्वाच्य शिवीगाळ करुन मारहाण केल्याची तक्रार जावयाने मंगळवारी मार्केट पोलिस स्थानकात दिली. अवधूत प्रशांत तुडवेकर (रा. बसवाण गल्ली, बेळगाव) असे तक्रारदाराचे नाव आहे.
अवधूत ची पत्नी भांडण काढून माहेरी गेली आहे.तसेच त्याला 30 ऑगस्टला खंजर गल्लीतू घरी जात असताना सासऱ्याने अर्वाच्य शिवीगाळ करुन मारहाण केली.याबरोबरच ठार मारण्याची धमकीही दिली.
यापूर्वी फोनवरुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आपल्या सासऱ्याची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी,आणि आपल्याला संरक्षण द्यावे अशी तक्रार दाखल मागणी त्यांने केली आहे.