नार्वेकर गल्ली येथील दादा महाराज अष्टेकर ज्योतिर्लिंग देवस्थान मध्ये नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात अंबाबाई ची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैष्णव माता ची स्थापना देखील करण्यात आली आहे. घटस्थापने दिवशी मंदिरात विधीवत पूजाअर्चा करून देवींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.
तरी भाविकांनी या नवरात्रोत्सव काळात मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे