बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं 2022 ते 2025 तीन वर्षासाठी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून विश्वास धुराजी यांची निवड यावेळी करण्यात आली.
सोमवार पेठ टिळकवाडी येथील डॉक्टर नीता देशपांडे यांच्या डायबिटीस सेंटर मधील सोसायटीच्या कार्यालयात पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी डीपी शिंदे होते
इतर कार्यकारणीची निवड पदी गुरुनाथ शिंदे सुरेंद्रनायक आर जी मुतालिक जवाहर देसाई विजय नायगडे सुरेंद्र देसाई प्रकाश कुडतरकर एडवोकेट मोहन सप्रे वनिता जोशी विनिता बाडगी यांची सर्वानुमती निवड करण्यात आली.
के एल मधुकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून यावेळी काम पाहिले तर यावेळी सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते शेवटी माळवते अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून नवीन कार्यकारणी सदस्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानले.