महिला विद्यालय शाळेचा १९९६/९७ बॅचचा स्नेहमेळावा संपन्न झाला.महिला विद्यालय शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगला.कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शाळेच्या चेअरपर्सन डॉ.सौ शोभा शानभाग तसेच शाळेचे मुख्याध्यापक वि एन पाटील सर उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थीनी स्मिता बसरीकट्टी आणि स्नेहल जोशी यांनी स्वागत गीताने केली.त्यानंतर शाळेच्या माजी विद्यार्थीनींनी महिला विद्यालय शालेय गीत सादर केले.मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे व माजी आणि आजी शिक्षकांना भेटवस्तू व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक वि एन पाटील सरांनी कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले तसेच शाळेच्या शताब्दी महोत्सवासंबंधी होणार्या कार्यक्रमाविषयी सांगितले.
डॉ शोभा शानभाग यांनी विद्यार्थीनींना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमासाठी उपस्थित माजी शिक्षक,शिक्षीका यांनी आपले मनोगत सादर केले तसेच माजी विद्यार्थीनींच्या वतीने रोशनी हुंद्रे यांनी आपले मनोगत सर्वांसमोर मांडले.त्यानंतर करमणुकीच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून माजी आणि आजी गुरू जणांसाठी संगित खुर्चीचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्नेहल जोशी (दांडगे)हिने उत्तम रित्या करून कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढविली शेवटी सर्वांचे आभार मानण्यात आले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या स्नेहमेळाव्यासाठी माजी गुरूजन मत्तिकोप टिचर, कांबळे टिचर,कुरट्टी मॅडम, पाटील सर, सुतार सर, नाईक सर,शिरगांवकर सर, गणपुले सर, तसेच सराफ टिचर आणि शाळेतील आजी शिक्षकवर्ग आवर्जून उपस्थित होते.या स्नेहमेळाव्याचे नियोजन राजश्री हुंद्रे आणि इतर मैत्रिणींच्या सहकार्याने करण्यात आले.स्नेहमेळाव्यासाठी शाळेच्या शिक्षिका अस्मिता देशपांडे यांनी वेळोवेळी सहकार्य केले.एकंदरीत हा मैत्री संयोग स्नेहमेळावा खुप छान पार पडला.