सायबर क्राईम भामटे वेगवेगळी शक्कल लढवून अनेकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार करत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात इंटरनेट 5g सेवेची घोषणा केली असतानाच भामटे नागरिकांना फसविण्याकरिता सज्ज झाले आहेत.
त्यामुळे पोलीस खात्यात कडून नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक होऊ नये तसेच त्यांना आर्थिक फटका बसू नये याकरिता जनजागृती करत आहेत.
जर आपल्याला कोणत्याही कंपनीमधून मी अमुक किंवा तमुक बोलतो आहे. आपला 4जी स्मार्टफोन आहे मात्र सरकारने घोषित केलेल्या 5g इंटरनेट सेवेप्रमाणे तुमचा डाटा 5g करायचा आहे असे सांगून जर तुमच्याकडून ओटीपी कोणी मागून घेत असेल तर अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
जर असे न झाल्यास आपल्याला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. भामटे आपला ओटीपी घेऊन आपल्या बँक अकाउंट मधील रक्कम काही सेकंदाच्या आत लंपास करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे भामट्यांचा हा नवा फंडा आपल्याला गंडा घालणार हे नक्की आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही फोन पासून सावधानता बाळगून लगेच तो नंबर पोलिसांना द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.