खानापूर तालुक्यातील मांगनाकोप्पा गावातील २६ वर्षीय मंजुनाथ तुकाराम वाणी हे मच्छीमार करण्यासाठी गेले असता त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे
खानापूर तालुक्यातील केरवडा तलावात तलावात मासेमारीसाठी ते गेले असता या मच्छिमाराचा मृतदेह आढळून आला आहे
ते 11 ऑक्टोबर रोजी मासे पकडण्यासाठी जाळे लावण्यासाठी गेले असता तलावात बुडाला.
याची माहिती मिळताच नंदगड पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध घेतला.तसेच तहसीलदार प्रवीण जैन यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर काल म्हणजे बुधवारी त्यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.याप्रकरणी नंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे