विजापूर जिल्ह्यात बसने आणि कारने पाठीमागून दोघांना धडक दिल्याने झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे. येथील पहिल्या घटनेत बस चालकाने आणि कंडक्टरने घटनास्थळावरून पळ काढला असून दुसऱ्या घटनेत एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की
विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील अर्जुनगी यक्कुंडी रोडवर सरकारी बसने मागून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
या घटनेत मुतव्वा गस्ती हे ठार झाले असून अपघातानंतर कंडक्टर आणि चालकाने बस घटनास्थळी सोडून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बबलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
तर दुसऱ्या घटनेत दुचाकीवरून रस्ता ओलांडताना कारने दुचाकीला धडक दिल्याने एका मुलाचा मृत्यू झाला असून ही घटना विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेबाडी तालुक्यातील मनागुली येथे घडली आहे.या अपघातात 12 वर्षीय रियाझचा मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पडताळणी केली आणि या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे .