कर्नाटकातील धर्मस्थळ येथे मृतदेह दफन केल्याचे पोलिसांना सांगत असलेल्या तक्रारदार मास्कमॅनला एसआयटी पथकाने अटक केली आहे.
आज पर्यंत अज्ञात तक्रारदार असलेल्या या व्यक्तीचे नाव आता पोलिसांनी जाहीर केले असून, एस एन चीनया असे त्याचे नाव आहे.
मागील महिनाभरापासून या तक्रारदाराने दाखवलेल्या 15 जागांवर लाखो रुपये खर्च करून एसआयटी पथकाने मानवी सांगाड्यासाठी खोदाईची काम केले. पण केवळ सहाव्या पॉईंटवर मात्र मानवी सांगाडा मिळाला होता.
त्यानंतर आता पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, तक्रारदाराने दिलेली माहिती खोटी असल्याचे समोर आले आहे. मी खोटी माहिती दिल्याचे त्याने कबूल केले आहे.
त्यामुळे एसआयटी पथकाने त्याला अटक केली आहे.
न्यायालयात हजर करून मेडिकल करून, पोलीस कस्टडी घेऊन चौकशी करणार आहे.
त्यामुळे मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात चर्चेत असलेले धर्मस्थळ प्रकरणाचे सत्य समोर येणार आहे.