बेळगावातील टिळकवाडीतील तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलावरील रस्त्याची वाताहत झाली आहे. अपघातप्रवण बनलेल्या या रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज या ठिकाणी उपोषण करण्यात आले माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी याठिकाणी उपोषणास प्रारंभ केला
उड्डाणपूल रस्त्याचे डांबरीकरण उखडून सर्वत्र धोकादायक खड्डे पडले आहेत. या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करुन तो
रहदारीसाठी सुरक्षित करावा यासाठी वेळोवेळी आंदोलन करुनही दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याच्या निषेधार्थ तसेच उड्डाणपुलावरील रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी या मागणीसाठी आज भर रस्त्यात उपोषण करण्यात आले.