खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज श्री लक्ष्मी देवी मंदिर खानापूर येथे समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी समितीचे सर्व कार्यकारणी सदस्य हजर होते .यावेळी येणारा एक नोव्हेंबर काळा दिन तालुक्यातील मराठी भाषिकांनी गांभीर्याने पळावा व याची जनजागृती संपूर्ण तालुक्यामधील मराठी भाषिक असलेल्या गावांमध्ये कशा पद्धतीने करावी याचे नियोजन करण्यात आले.
एक नोव्हेंबर काळा दिनाची जागृती करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधून कोपरा सभा घेऊन जनजागृती करण्यात यावी असे एकमताने ठरवण्यात आले.याची सुरुवात क कुंबी येथून श्री माऊली देवी मंदिरापासून शनिवारी तारीख 15 रोजी आयोजित केले आहे .
यावेळी राजाराम देसाई पीएच पाटील पांडुरंग सावंत गोपाळराव पाटील युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील सुरेश देसाई निरंजन सरदेसाई यांनी येणाऱ्या एक नोव्हेंबर काळा दिनासंदर्भात आपले विचार व्यक्त केले. व दरवर्षीप्रमाणे शिवस्मारक या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत धरणे आंदोलन धरून केंद्र सरकारचा निषेध केला जाणार आहे.
तसेच समितीची संघटना मजबूत करण्यासाठी एक नोव्हेंबर नंतर तालुक्यातील प्रत्येक मराठी गावांमधून भगवा झेंडा पद यात्रेने संपर्क साधून प्रत्येक मराठी गावाला समितीचा भगवा झेंडा बळकट करण्यासाठी समितीचा भगवा झेंडा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे देण्यात यावा व संघटना बळकट करावी असे मत युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी मांडले,तसेच निरंजन सरदेसाई व सुरेश देसाई यांनी दुजोरा दिला व त्यासाठी नियोजन करण्याचे ठरविण्यात आले
यावेळी अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी झालेली सर्व चर्चा सकारात्मक आहे या चर्चेला माझा पूर्ण पाठिंबा आहे असे सांगून येणारा एक नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्यासाठी समितीच्या सर्व कार्यकारणी सदस्याने जोमाने कार्य करावं व प्रत्येक मराठी भाषिकांना काळा दिनाचे गांभीर्य सांगून निषेध सभेत भाग घेण्यासाठी प्रेरित करावं असे सांगितले. यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते देवाप्पाजी गुरव सूर्याजी पाटील विनायक सावंत रवींद्र शिंदे रवींद्र पाटील बळीराम पाटील दत्तू कुठरे युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील प्रतीक देसाई उपस्थित होते.