महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक आज युवा समिती कार्यालय येथे शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सामील होत हा दिवस गांभीर्याने पाळावा असा एकमुखी ठराव करण्यात आला तसेच बेळगावच्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या रिंगरोडला विरोध दर्शविण्यात आला आणि शेतकऱ्यांच्या सोबत लढ्यात सामील होण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनानुसार सर्वानी काळ्या दिनात सहभागी व्हावे तसेच युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तेथील युवक 1 नोव्हेंबर दिवशी काळा दिवस पाळत संबंधित जिल्ह्यात निवेदन सादर करणार आहेत अशी माहिती दिली तसेच युवा समिती रिंगरोड विरोधी लढ्यात शेतकऱ्यांच्या सोबत आहे असे सांगितले.उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांनी सायकल सहभागी होताना शिस्त पाळावी आणि हुल्लडबाजी करणार्यांना रोखावे तसेच सीमाप्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभर पोहचवण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावा असे सांगितले, मनोहर हुंदरे यांनी सर्वानी रिंगरोडला विरोध दर्शवावा असे सांगितले, कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर यांनी काळ्या दिनात सर्वानी सहभागी होणे हे सर्व मराठी भाषिकांचे कर्तव्य असून सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन केले.
नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी सुद्धा शिवाजी नगरच्या वतीने पाठिंबा देत काळा दिवस यशस्वी करण्याचे आवाहन केले. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी येत्या काळ्या दिनाचे औचित्य साधत सर्वानी आपले सोशल मोडिया प्रौफाईलचे डीपी काळे करावेत आणि हा प्रश्न देशभरात पोहचवावा असे आवाहन केले.यावेळी रणजित हवळणाचे, अभिजित मजूकर, राजू पाटील, बापू भडांगे, आदींनी आपले विचार मांडले
यावेळी विनायक कावळे,शुभम मन्नुरकर,महेश मन्नुरकर,आनंद पाटील,भावेश बिर्जै,दत्ता पाटील,निखिल देसाई,महेश चौगुले,मयूर अनगोळकर,भरमा पाटील,प्रथमेश मन्नुरकर,श्री कडोलकर,आकाश भेकणे,प्रवीण रेडेकर, महेश जाधव,परशराम भांदुर्गे,चेतन राघोजी,प्रतीक पाटील आदी उपस्थित होते, उपाध्यक्ष सचिन केळवेकर यांनी आभार मानले.