अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या पाडव्यानिमित्त चव्हाट गल्लीत पाळण्यात येणारी म्हैस पळविण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे.
तसेच दिवाळी पाडव्यानिमित्त बेळगावात म्हशींची सजावट करून त्यांचे पूजन देखील करण्यात येते.
त्यामुळे काल शहरात हौशी म्हैस मालकांनी दीपावली पाडव्यानिमित्त म्हशींची सजावट करून म्हैस पळविण्याची परंपरा झोपली त्यानंतर घरी जाऊन त्यांची मनोभावे पूजा केली.
शहरातील चव्हाट गल्ली गोंधळी गल्ली कोनवाळ गल्ली टिळकवाडी सोमवार पेठ शहापूर आनंदवाडी वडगाव यासह ग्रामीण भागात दुभत्या जनावर माया दाखवून पाडव्याचा हा सण साजरा करण्यात आला
प्रामुख्याने येथील चव्हाट गल्लीत गेल्या कित्येक वर्षांपासून पाळण्यात येणारी परंपरा डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली
या ठिकाणी घेऊन येणाऱ्या म्हशीचे रुप अगदी बघण्यासारखे होते . पशुपालकांचा आपल्या दुभत्या जणांवर असलेलं प्रेम सजवलेल्या म्हशींच देखन रूप पाडव्या दिवशी काल पाहायला मिळालं.
रंगवलेली शिंगे त्याला घोंडे तसेच म्हशीला मोरपिसाचा तुरा गळ्यात रंगीबिरंगी हार कवड्यांची माळ म्हशीची तुळतुळीत कांती आणि त्यांचा आज्ञाधारकपणा पाहिल्यावर हे एक वेगळीच विश्व आहे याची खात्री पटली
तसेच सजवलेल्या म्हशीना गाडीच्या मागे पळवत चव्हाटा मंदिराभोवती फिरविन्यात आले . तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले युवकांनी देखील या क्षणाचा आनंद लुटला.