तालुक्यामधील मराठी बहुभाषिक गावांमध्ये एक नोव्हेंबर काळा दिनानिमित्त पत्रके वाटून जागृती करण्यात येत आहे आज सीमा लढ्यामधील प्रत्येक आंदोलनामध्ये अग्रभागी असणारे गर्लगुंजी तसेच बिदरभावी व तोपीनकट्टी या गावात एक नोव्हेंबर काळा दिन गावातील मराठी भाषिकांनी कडकडीत पळावा व केंद्र शासनाने मराठी भाषिकांवर केलेल्या अन्यायावर परत एकदा मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करून केंद्र शासनाचा निषेध करावा व खानापूर येथील लक्ष्मी मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अकरा ते दोन या वेळेत उपोषण व सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेमध्ये प्रत्येक गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून केंद्र शासनाला याची नोंद घ्यायला लावावी, असे आवाहन समितीचे ज्येष्ठ नेते व माजी सभापती सुरेशराव देसाई यांनी केली तसेच गेल्या 65 वर्षापासून महाराष्ट्राचा मराठी बहुभाषिक असलेला भाग हा कर्नाटकामध्ये जोडण्यात आला आहे त्या विरोधात आमच्या ज्येष्ठांनी यलगार पुकारलेला आहे सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्न प्रलंबित असताना रस्त्यावरच्या लढाईत आम्ही कुठेही ढिलाई न करता एक नोव्हेंबर काळा दिन आम्ही सर्वांनी गांभीर्याने पाळून केंद्र शासनाचा निषेध करूयात यासाठी गर्लगुंजीतील मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी होतील असे माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांनी सांगितले, यानंतर बिदरभावी तसेच तोपीनकट्टी येथेही नागरिकांच्या भेटी घेऊन जागृती करण्यात आली, यावेळी खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई समितीचे ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील समितीचे ज्येष्ठ नेते देवाप्पांना गुरव, सूर्याजी पाटील, अजित पाटील, राजाराम देसाई, गर्लगुंजी गावचे सुनील पाटील, प्रमोद पाटील, शिवाजी गावडे, सुरेश मेलगे, शिवाजी हुंदरे, रमेश दावतार, संजय पाटील, येरमाळकर, संतोष नारायण पाटील, नारायण सावंत, सातेरी सावंत, बाबुराव धामणेकर, महेश सावंत, महादेव गुरव, बिदरभावी येथे इराप्पा पाटील,बळीराम पाटील आदी तसेच तोपीनकट्टी येथे तोपीनकट्टी— नागो गुरव,महादेव गुरव, देवाप्पा गुरव,काळेशी बाचोळकर,गंगाराम बाचोळकर, विजय सुतार,सुरेश करंबळकर,परशराम गुरव,मनोहर गुरव,भीमसेन करंबळकर,सुदत्त करंबळकर आदी उपस्थित होते
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गर्लगुंजी,बिदरभावी, तोपीनकट्टी येथे १ नोव्हेंबरची जनजागृती
By Akshata Naik
Previous articleभाऊबीज (यमद्वितीया)
Next articleम्हैस पळवून परंपरा जोपासली