श्री हनुमान दूध उत्पादन संस्था यळेबैल दिवाळीनिमित्त बोनस वितरण कार्यक्रम सोहळा दिनांक 27 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडला. या संस्थेच या वर्षातील एकूण दूध संकलन गाईचे दूध 49262 व म्हशीचे 56079 झाले .या वर्षाचा बोनस एकूण सात लाख 40 हजार रुपये वाटप करण्यात आला .
यामध्ये म्हशीचे दूध लिटर प्रमाणे आठ रुपये 70 पैसे व गायीचे पाच रुपये सहा पैसे अशा रीतीने बोनस वितरण करण्यात आला .यामध्ये गाईच्या दुधामध्ये प्रथम क्रमांक श्री दुर्गु यादो पाटील द्वितीय क्रमांक श्री यल्लाप्पा मारुती शहापूरकर तृतीय क्रमांक श्री परशराम दुर्गु पाटील त्याचबरोबर म्हशी दूध मध्ये प्रथम क्रमांक श्री दुर्गु यादव पाटील द्वितीय क्रमांक श्री लक्ष्मण महादेव शहापूरकर तृतीय क्रमांक श्री देवाप्पा हनुमंत पाटील यावेळी संस्थेचे सर्व सदस्य व संस्थेचे सेक्रेटरी श्रीमान ज्योतिबा भरमु पाटील उपस्थित होते त्याचबरोबर आदित्य दूध डेरीचे सुपरवायझर श्री परशराम शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.