स्टार इलेव्हन युवक मंडळाच्या सौजन्याने खास दीपावलीनिमित्त आयोजन
हौशी रेकॉर्ड डान्स स्पर्धकांनी सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन
सुळगा (हिं.) / वार्ताहर
लक्ष्मी गल्ली, सुळगा (हिं.) येथील स्टार इलेव्हन युवक मंडळाच्या सौजन्याने, खास दीपावलीनिमित्त मौजे सुळगा (हिं.) ता. जि. बेळगाव येथे उद्या शनिवार दि. 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.00 वा. लक्ष्मी गल्ली सुळगा (हिं.) येथे भव्य खुल्या व गाव मर्यादित रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री. विनय विलास कदम (माजी अध्यक्ष भा.ज.प. बेळगाव ग्रामीण, डायरेक्टर बेळगाव तालुका ए. पी.एम.सी.एस) हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
यावेळी श्री. आर. आर. चौगुले (डायरेक्टर,ज्योतिर्लिंग मल्टी-पर्पज को-ऑप, सोसायटी लि. मण्णूर), श्री.नारायणराव झंगरूचे सोनोली अध्यक्ष, मराठा संघटना, बेळगांव) यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज फोटो पूजन तर श्री.अक्षय काकडे (वर्षा ऑप्टीकल्स) श्री. संतोष पवार (कृष्णाई पेंट्स) यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन होणार आहे.
कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन सुळगा (हिं.) ग्रा. पं. अध्यक्षा सौ. निर्मला यल्लाप्पा कलखांबकर, उपाध्यक्षा सौ. अश्विनी परशराम खन्नूकर यांच्यासह सर्व ग्रा. पं. सदस्यांच्या हस्ते होणार आहे.
श्री. सागर भरमा सांगावकर, सौ. वर्षा सागर सांगावकर यांच्या हस्ते नटराज फोटो पूजन, श्रीमती. मंगला सुरेश अंगडी, (खासदार बेळगाव) यांच्या हस्ते स्टेजचे उद्घाटन तर श्री. संजय य. पाटील (चेअरमन कुद्रेमनी), श्री परशराम र. तुप्पट (अध्यक्ष, बेळगांव तालुका, विठ्ठल रुक्मिणी वारकरी संप्रदाय) यांच्या हस्ते श्री गणेश फोटो पूजन होणार आहे.
या कार्यक्रमाला श्री. देवस्थान पंच कमिटी सुळगा (हिं.) अध्यक्ष व सर्व सदस्य आणि एस. डी. एम. सी. कमिटी अध्यक्ष व सर्व सदस्य प्रमुख अतिथी म्हणून तर श्री. विलास भावकू देवगेकर (बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर), श्री. नारायण लक्ष्मण कदम (माजी तालुका पंचायत सदस्य), श्री.परशराम कदम (साई प्लायवुड्स) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री. शेखर पाटील, श्री. विजय पाटील, ऋतुजा अनिल कदम हे आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
श्री. उमेश पाटील, (गुरुप्रसाद काजू फॅक्टरी), श्री. गणपत कलखांबकर (फर्निचर कॉन्ट्रॅक्टर), श्री. नयन बाळू कदम (विजय ट्रेडर्स), श्री. सतिश पाटील, (फर्निचर कॉन्ट्रॅक्टर), श्री. दिपक पाटील, राजू पाटील (ओमकार दूध डेअरी) यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.
खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी रु. 501/- तर गाव मर्यादित रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी रु.251/- प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. खुल्या रेकॉर्ड स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी श्री. सागर भरमा सांगावकर (पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर) यांच्या कडून रु.11,001/-, द्वितीय क्रमांकासाठी श्री. युवराज परशराम देवगेकर (एस.आर.पेंट्स) व श्री. बाळकृष्ण मोनाप्पा पाटील (एस. एम. कन्स्ट्रक्शन) यांच्याकडून रु.7001/- आणि तृतीय क्रमांकासाठी (श्री.संतोष पवार कृष्णाई पेंट्स) यांच्याकडून रु. 3001/- तर गाव मर्यादित रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी कु. पवन शिवाजी कलखांबकर (बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर) यांच्याकडून रु. 3001/-, द्वितीय क्रमांकासाठी परशराम यल्लाप्पा मन्नोलकर (सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर) यांच्याकडून रु.2001/- आणि तृतीय क्रमांकासाठी श्री. यल्लाप्पा परशराम कुडचीकर (पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर) यांच्याकडून रु.1001/- अशी भव्य बक्षीसे देण्यात येणार आहेत.
श्री. देवस्की पंच कमिटी, सुळगा (हिं.) यांच्यातर्फे स्पर्धेतील बेस्ट डान्सर ओपन बक्षीस रु. 1501/- तर चषक श्री. अनिल लक्ष्मण कदम (प्रगतशील शेतकरी), सदबा साऊंड सिस्टम तुरमुरी यांच्यातर्फे देण्यात येणार आहे.
स्पर्धेत नावे नोंदवण्यासाठी सुनील पाटील- 9060158144, मयुर पाटील-9113625335, संतोष पाटील – 9113661373, वैभव पाटील – 8867678930
यांच्याशी संपर्क साधावा तसेच हौशी रेकॉर्ड डान्स स्पर्धकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.