बेळगाव- “भरतेश शिक्षण संस्था आपला हिरक महोत्सव साजरा करीत असताना विविध उपक्रम राबवीत असून याचाच एक भाग म्हणून हलगा परिसरातील चार गावे दत्तक घेण्यात आली आहेत. या गावांचा संपूर्णत: कायापालट करण्याच्या दृष्टीने संस्थेचे काम सुरू आहे. याशिवाय जिल्हा पातळीवरील हॉलीबॉल व क्रिकेटच्या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. पुढील महिन्यात ॲथलेटिक्स टूर्नामेंट आणि एक दिवशीय मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार आहे. भरतेश शैक्षणिक संस्था शिक्षणाबरोबरच विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिली असून यापुढे हे कार्य असेच चालू राहणार आहे”अशी माहिती भरतेश शिक्षण संस्थेचे संचालक श्री विनोद दोड्डनावर यांनी बोलताना दिली.
भरतेश शिक्षण संस्था आणि शांताई वृद्धाश्रमाच्या वतीने रविवारी भरतेशच्या निवृत्त शिक्षकांचा सन्मान व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शांताई वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री विनोद दोड्डनावर हे होते पाहुणे म्हणून डॉक्टर प्रीती हजारे, विजय मोरे व नागेश चौगुले हे होते.
” स्वर्ग म्हणजे काय? तो कोठे असेल असतो हे पहायचे असेल तर प्रत्येकाने शांताई वृद्धाश्रमाला भेट द्यायला हवी असेही दोड्डनावर म्हणाले. “अवयव दान ही काळाची गरज असून त्या दृष्टीने प्रत्येकाने नोंदणी करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. माहेश्वरी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रार्थना गीतानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत भरतेश हायस्कूलचे मुख्याध्यापक एस एन अक्की यांनी केल्यानंतर विजय मोरे यांनी शांताई वृद्धाश्रमाच्या कार्याचा आढावा घेतला .”1998 साली केवळ तीन आजी-आजोबांना घेऊन सुरू केलेल्या या आश्रमात आता 40 -45 जण गुण्यागोविंदाने राहत आहेत. माझ्या भरतेश मधील शिक्षकांनी आम्हाला सर्व प्रकारची मदत केली त्यामुळेच मी शिकू शकलो असा कृतज्ञतापूर्न उल्लेख श्री विजय मोरे यांनी केला. श्वेता गोरगोंडा, रवी दोडनावर ,रवी मेलिनमनी विना कुंडुर, रेखा दोडनवर आदी माजी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
” शिक्षक हे आपल्या कार्याने समाजामध्ये बदल घडवू शकतात असे सांगून डॉक्टर प्रीती हजारे यांनी मूकबधिर लोकांसाठी सरकारने केलेल्या कार्याची माहिती दिली. केएल ई एस्पितळत मूकबधिर लोकांच्यावर मोफत उपचार केले जातात असेही त्यांनी सांगितले
याप्रसंगी सर्व निवृत्त शिक्षक सर्वश्री जे बी जनगौडा, बी एल सायनेकर, एम बी पाटील, अनंत लाड, टी पी चौगुले, आर एस कुकडोळकर, डी एच पाटील, श्रीमती के डी पाटील, श्रीमती देवकी काकती या शिक्षकांसह एस के बेले ,डी जे मुतगी आणि इतर निवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थी संघटना आणि माजी शिक्षकांनी सुद्धा सढळ हस्ते शांताई वृद्धाश्रमास मदत केली. याप्रसंगी शिक्षक सर्वश्री अनंत लाड, टी पी चौगुले यांची भाषणे झाली. रजनीताई या वृद्धेने ‘शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असून माणूस घडवण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांचा हा सन्मान’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या
शिक्षण संस्थेच्या वतीने काही वस्तू शांताई वृद्धाश्रमास भेट देण्यात आल्या. वेगळ्या स्मृती जपणारा असा हा आनंदी सोहळा सहभोजनाने संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले तर विना कुंडुर यांनी आभार मानले.100 हुन अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.