बेळगाव ते दिल्ली या विमान सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद असून देखील १२ डिसेंबर पासून स्पाईस जेट कंपनी ने बेळगाव दिल्ली सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे बेळगाव ते दिल्ली विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा मोठा फटका बसला आहे.
बेळगाव शहर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा च्या सीमेवर वसलेले मोठे शहर असून, इथल्या फौंड्री उद्योगामुळे बेळगाव शहराने संपूर्ण देशात नावलौकिक मिळवले आहे.
बेळगाव – दिल्ली स्पाईस जेट विमान सेवा एप्रिल २०२२ पासून बेळगाव वासियांच्या सेवेत दाखल झाली, सदर विमान सेवे मुळे बेळगाव, कोल्हापूर, विजापूर, सांगली मधील सामान्य नागरिकांना तथा उद्योजकांना दिल्ली ला जायला सोयीस्कर होती आणि ती अल्पावधीतच लोकप्रिय झाली.
एप्रिल २०२२ पासून ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत जवळपास ५०,००० हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
केंद्रिय मंत्र्यांना स्वतः लक्ष घालून सर्व विमान सेवा कंपन्यांशी सल्लामसलत करून बेळगाव ते दिल्ली विमान सेवा पूर्ववत करावी तसेच बेळगाव शहराला भारतातील महत्वाच्या शहराशी जोडावेत आणि इतर सेवा सुद्धा बंद न करता जास्तीतजास्त फेऱ्या बेळगाव साठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे म. ए. युवा समिती ने केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे केली आहे