येथील नार्वेकर गल्लीमधील ज्योतिर्लिंग देवस्थानमध्ये मकर संक्रांती निमित्त ज्योतिबाला तिळगुळाचे दागिने घालण्यात आले आहेत .यावेळी सकाळी अभिषेक करण्यात आला .तसेच सत्यनारायची पूजा करून दुपारी बारा वाजता आरती करण्यात आली.त्यानंतर सायंकाळी तिळगुळाचा कार्यक्रम पार पडला
तसेच मकर संक्रांती निमित्त मंदिरात हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम देखील पार पडला.यावेळी सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांनी आपल्यातर्फे मंदिरातील सर्व महिलांना तुळशीचे रोप दिले. आणि मंदिराला बेलपत्राचे रोप देऊ केले.
यावेळी त्यांनी तुळशीचे रोप किती महत्त्वाचे आहे.तुळशीचे रोप फक्त धार्मिक नाही तर वैज्ञानिक कारणाने सुद्धा आपल्याला उपयोगी पडते तुळशीच्या सानिध्यात आपण राहिल्यास आपण निरोगी आयुष्य
जगतो. त्यामुळे संस्थेतर्फे देण्यात आलेली ही रोपे त्यांनी आपल्या घरी चांगल्या पद्धतीने वाढवावीत.
महिलांनी तुळशीची दररोज पूजा केल्यास त्यांचे सौभाग्य अखंड राहते. आणि या रोपाची सेवा केल्यास आपल्या घरात भरभराट होते असे मनोगत व्यक्त केले.त्यानंतर ज्योतिर्लिंग देवस्थानच्या वतीने वीरेश हिरेमठ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळ परिवार आणि भाविक उपस्थित होते.