महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आज भव्य सामान्य ज्ञान स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदस्य स्पर्धा मराठा मंदिर येथे भव्य प्रमाणात पार पडली.यावेळी या परीक्षेत प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयीन गटातील जवळपास 1800 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.
प्रारंभी या स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो पूजनाने करण्यात आली.त्यानंतर हुताम्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. आणि श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेकरिता आपासाहेब गुरव,दीपक दळवी,प्रकाश मरगाळे,दिगंबर पवार, महादेव चौगुले,आर्यन चौगुले,मालोजीराव अष्टेकर, सुधीर चव्हाण,लक्ष्मण सैनूचे,नगरसेवक शिवाजी मंडोळकर,अनिल पवार,अंकुश केसरकर,सुरज कुडूचकर, सचिन केळवेकर, श्रीकांत कदम उपस्थित होते.