महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन यांचे मार्फत धुळे येथे सब ज्युनिअर राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेतून कोल्हापूर जिल्हयाचे प्रतिनिधित्व करणारा व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूल,कबनूरचा विध्यार्थी सोहम मुंकुद ओझा याची महाराष्ट्र संघासाठी निवड करण्यात आली असून बेळगाव येथे होणाऱ्या १५ व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामधून तो खेळणार आहे. येथील सत्यनारायण जोशी (नागोरी) यांचा कु.सोहम हा नातू असून या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.