9 एप्रिल रोजी बी.के – ज्योती कॉलेजच्या माजी विद्यार्थी महामेळाव्याचे आयोजन : सहभागी होण्याचे आवाहन*
समाजाच्या तळागाळातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे कल्याणकारी योजना आखून त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता दिशा देणारे उपक्रम आखून जीवनात त्यांच्या नंदनवन होईल असे कार्य करणे जरुरीचे आहे. योग्य प्रकारची दिशा देण्यारे चांगले दृष्टिकोन ध्येय गाठण्यासाठी संस्कारमय नितीमूल्य रुजवून करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या जगात वावरत असताना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते ते सामर्थ्य समाजामध्ये बिंबवण्यासाठी आणि त्याला तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण करण्यासाठी अशा वेगळ्या भूमिकेतून त्यांच्या जीवनाला कलाटनी देणारे उपक्रम राबवून यशस्वी मार्गक्रमण करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असायला हवे. स्पर्धात्मक टिकून राहण्यासाठी ज्ञान मिळवणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी योग्य वेळी प्रोत्साहन गरज आहे. खडतर प्रवास करून मजल मारायचे असेल तर खडतर प्रयत्नाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि ते कष्टाचे दिवस आपण घालून जिद्द चिकाटीने प्रामाणिक अत्यंत प्रयत्न करणे खूप गरजेचे बनलेले आहे तरच आपण या स्पर्धात्मक काळात टिकू शकतो अन्यथा कठीण आहे. आपल्या कार्यात प्रामाणिकपणा सातत्य जिद्द चिकाटी मेहनत खडतर प्रयत्न आणि सातत्य ठेवल्याने देह गाठण्यासाठी अधिक वेळ लागत नाही आपण यशाचे शिखर नक्कीच गाठू यात वाद नाही मनात आपण मोठमोठी स्वप्ने पाहायला पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी नेहमीच अथक परिश्रम घ्यावेत तरच जीवनात मागे कधीच आपण पडू शकणार नाही त्यासाठी जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आपल्या ज्ञानात भर टाकने खूप गरजेचे असून ध्येय गाठण्यासाठी वेळोवेळी सतत प्रयत्न करायला हवा आणि आधुनिक काळात विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना योग्य प्रकारची दिशा देण्याचे काम आम्ही माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करणार आहोत यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे सहकार करण्याची भावना या ठिकाणी प्रत्येकाने करायला हवी तरच आपला भारत देश सशक्त आणि समृद्ध होऊ शकेल यासाठी प्रत्येकाने हातभार लावायला हवा. असे प्रतिपादन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष व समाजसेवक श्री आर वाय पाटील यांनी केले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव भाऊराव काकतकर महाविद्यालय आणि ज्योती महाविद्यालय बेळगाव , माजी विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 25 जानेवारी 2023 रोजी आणि 9 एप्रिल 2023 रोजी होणारा माजी विद्यार्थी सहस्नेह महामेळावा यशस्वी करण्यासंदर्भात बैठक बोलवण्यात आली होती; मारुतीराव काकतकर महाविद्यालयाच्या जिमखाना सभागृहात माझी विद्यार्थी संघटनेची कार्यकारणी ची बैठक यशस्वी संपन्न झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील होते. प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून माझी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष समाजसेवक आर वाय पाटील, सचिव प्रा सी. वाय पाटील, प्रा. निलेश शिंदे, डी बी पाटील , चार्टर अकाउंटंट एस एस. बरगावकर, प्रा एम एस पाटील, कांचन पन्हाळकर, बि. जी. गाडेकर, राजाराम हलगेकर, प्रा. एस एस पाटील, प्रा. महादेव नार्वेकर उपस्थित होते. स्वागत प्रा नितिन घोरपडे, प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटना समन्वयक प्रा. डॉ.एम. व्हि. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन नारायण तोराळकर यांनी केले तर आभार प्रा. एन. एन. शिंदे यांनी मानले.
बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पाडण्यासंदर्भात आणि यशस्वी करण्यासंदर्भात वेगवेगळे कार्याची वाटप करून जबाबदाऱ्या देण्यात आल्या. कार्यकारणीचे पुनर्गठन चर्चा वेगवेगळ्या विषया वर करण्यात आली. माजी विद्यार्थी संघटनेची नूतन कार्य करणे निवड प्रक्रिया घेऊन नवोदित सदस्यांना सामावून घेतले जावे आणि नूतन कमिटी निवड करण्यात यावी यासाठी सर्वानुमते अनुमोदन देऊन नवी कार्यकारणी सदस्य निवड प्रक्रिया राबवावी असा ठराव पास करण्यात आला. 9 एप्रिल 2023 च्या पहिल्या आठवड्यात माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह महामेळावा मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार असून हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवून यशस्वी करावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले. माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक मनोरंजन प्रबोधनात्मक कार्य प्रबोधनात्मक व्याख्यान परिवर्तनात्मक स्पर्धात्मक परीक्षा, या परीक्षा संदर्भात मार्गदर्शन शिबिर आणि व्याख्याने, कला क्रीडा साहित्य यासह विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या जनकल्याणकरिता उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक आजी माझी विद्यार्थ्यांनी या कार्यात सहभाग घ्यावा आणि चांगल्या पद्धतीने कार्य पुढे नेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे. होतकरू गोरगरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि वेगवेगळ्या पद्धतीने सहकार करण्याची नवी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. N शिष्यवृत्ती देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शिक्षणात मदत व्हावी यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्यकरणाची संकल्पना सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. पुढील बैठक शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी माझी विद्यार्थी संघटनेची बैठक भाऊराव काकतकर महाविद्यालय आणि ज्योती महाविद्यालय येथील सभागृहात दुपारी एक वाजता होणार आहे. तरी सर्वांनी सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघटना चे अधिकारी अध्यक्ष समाजसेवक श्री आर वाय पाटील आणि सचिव शिवाय पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन पाटील यांनी केलेले आहे.