इस्लामी अतिक्रमणे रोखण्यासाठी जागरूक नागरिकांनी पोलीस तक्रारी करण्यासाठी पुढे यावे अन्यथा पुढे हिंदूंसाठी कठीण स्थिती ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वोच्च न्यायालय
रस्ते, पूल, स्थानके आदी ठिकाणी अतिक्रमण करून मशिदी, मजार उभारणे हे दिल्ली, गुरुग्राम यांसारख्या शहरांत नित्याचे झाले आहे आणि याला विरोध केला, तर वक्फ बोर्ड त्यांच्यासाठी धावून येतो. आपल्या परिसरात दिसणारी अशी अतिक्रमणे रोखण्यासाठी पोलीस-प्रशासनाकडे प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यासाठी जागरूक नागरिकांनी पुढे येणे आवश्यक आहे. योग्य प्रकारे तक्रारी दाखल केल्यास पोलीस-प्रशासनाला त्याची नक्कीच दखल घ्यावी लागेल. ही अतिक्रमणे रोखण्यासाठी आता प्रयत्न न केल्यास पुढे हिंदूंसाठी कठीण होऊन बसेल, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता उमेश शर्मा यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘सरकारी भूमीवर अवैध अतिक्रमण - लॅण्ड जिहाद ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
अखिल भारत हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. सुरेश जैन म्हणाले की, महाराष्ट्र, राजस्थान आदी राज्यांत गड-किल्ल्यांवर अवैधपणे मशिदी उभारल्या आहेत. येथील सरकारे मूक-बधीर झाली आहेत. हिंदूंनी पुढे येऊन याला विरोध केला पाहिजे. हिंदु आता जागृत होत आहे. ही अतिक्रमणे रोखण्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने सर्वतोपरी विरोध करू.
कर्नाटक येथील उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या मीरा राघवेंद्र म्हणाल्या की, देशभरातील विविध राज्यांत रस्ते, सरकारी संपत्ती येथे अतिक्रमण करून मशिदी उभारण्याच्या घटना वाढत आहेत. हा सुरू असलेला ‘लॅण्ड जिहाद’ रोखण्यासाठी आपल्या देशात कायदा आणण्यासाठी आवश्यकता आहे. आज आपल्या देशात हिंदु असुरक्षित आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंदूंना विविध प्रकारे कार्य करतांना कायद्याची मदत मिळणे गरजेचे आहे.
हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ता श्री. मोहन गौडा म्हणाले की, कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कामगारांच्या विश्रांतीगृहाचे मुसलमानांनी मशिदीत रूपांतर केले होते. गेल्या 10 वर्षांपासून चालू असलेल्या या अवैधपणे रूपांतरीत केलेल्या मशिदीला हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाला दखल घ्यावी लागली. परिणामी येथील विश्रांतीगृहातील मशिदीच्या खाणाखुणा मिटवून त्याचे स्वरूप पूर्वीच्या स्थितीत करावे लागले. या संदर्भात दोषी रेल्वे अधिकार्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही. बंगळुरूसह देशात विविध ठिकाणी सरकारी आणि अन्य भूमीवर अतिक्रमणे होत असून हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. हिंदूंनी जागृत होऊन हे रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे.
आपला नम्र,
श्री. रमेश शिंदे
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क : 99879 66666)