कार्तिक सिंग असे उत्तराखंड मधील शिव भक्ताचे नाव
वर्ष भर सायकल वरून प्रवास करून 350 किल्ल्याना देणार भेटी
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० किल्ले सर करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, बेळगावात आगमन झाले आहे उत्तराखंड पासून ते महाराष्ट्र आणि त्यानंतर चंदगड मधील गडकिल्ले प्रवास पूर्ण केला आहे उत्तराखंडच्या कार्तिक सिंगने सायकल वरून जाऊन हा इतिहास जपण्याविषयी जनजागृती करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. उत्तराखंड मधून १३२ दिवस प्रवास चालू असून, पुणे सातारा, नाशिक हे जिल्हे झालेले असून, अजून एक वर्षभर
प्रवास सुरू राहणार आहे. चंदगड येथील महिपाळ गड पार गड ,कालानंदी गड संपूर्ण पाहून झालेले आहेत. तर आज बेळगावातील एस पी एम रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती या ठिकाणी भेट देण्यात आली. यावेळी बेळगावातील श्री राम सेना हिंदुस्थानच्या युवकांनी उत्तराखंड येथील शिवभक्ताचे उत्साहात स्वागत केले. उत्तराखंडच्या छोट्याशा गावातील सायकलवर निघालेल्या कार्तिक सिंग यांनी आतापर्यंत 65 किल्ल्यांना भेटी दिल्या. ३५० किल्ल्यांना तो भेटी देणार आहे. कराड या ठिकाणी दोन दिवस 1 मुक्काम केला त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी विशाल गडावर, तसेच छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा भेटी दिली . या युवकामुळे महाराष्ट्रातील युवकांना याची प्रेरणा मिळणार आहे.बेळगावला चार दिवस मुक्काम करून तो पुन्हा उरलेल्या गड किल्यांची सर करणार आहे.