कारवे (ता. चंदगड): राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बुद्रुक येथील सीमाकवी, शिक्षक, पत्रकार व साहित्यिक रवींद्र पाटील यांचा जिल्हास्तरीय नवोपक्रम पुरस्कार आणि ३३व्या कराड साहित्य संमेलनातील विशेष सन्मान प्राप्त केल्याबद्दल पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार श्री. दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या गौरव समारंभात त्यांना शाल, शाहू महाराज गौरव ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
रवींद्र पाटील यांचे शिक्षण, साहित्य, पत्रकारिता आणि नवोपक्रमातील योगदान अत्यंत उल्लेखनीय असून, सीमावर्ती भागात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य एम. एम. गावडे हे होते.
मंचावर गुलाबराव पाटील ,पुणे विभागीय संपर्क प्रमुख राजेंद्र आसबे (सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे सचिव), आणि समाधान घाटगे (कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख) मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचालन शिवाजी मोहनगेकर सर यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक भोगुलकर सर यांनी केले.