बेळगाव प्रतिनिधी
कार पार्किंग बापट गल्ली येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिराच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना महागडे शैक्षणिक साहित्य घेण्यात अडथळे उद्भवून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन मंदिरातर्फे हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते शैक्षणिक सामग्रीचे वितरण करण्यात आले. यावेळी लोकेश रजपूत यांनी सदर वितरणाची व्यवस्था केली होती. याप्रसंगी जितेंद्र रजपूत यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.