बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांची प्रचार पदयात्रा आज आझाद गल्ली परिसरात पार पडली.
गुरुवार दि. २७ रोजी उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांनी प्रचारफेरी काढून घरोघरी जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीलाच मत घालण्याची याचना केली.
यांची ही प्रचार पदयात्रा आझाद गल्ली, माळी गल्ली, कामत गल्ली मार्गे टेंगिनकेरी गल्ली येथे पोहचून समाप्त झाली. गल्लोगल्ली उमेदवार अमर येळ्ळूरकर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
महिलांनी त्यांचे औक्षण केले. याप्रसंगी समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली.