जिल्ह्यात अजून पावसाळ्याला सुरुवात झाली नसल्याने घटप्रभा नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे परिणामी नदीतील मासे पाण्याविना मरण पावले आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील नलानट्टी या गावात त्याचबरोबर बाळोबाळ या गावाजवळ मासे मृता अवस्थेत पडले आहेत
त्यामुळे आजूबाजूच्या गावात दुर्गंधी पसरली असून गावामध्ये रोगराई पसरण्याची भीती गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
आधीच नदीचे पाणी आटले असल्यामुळे लाखो मासे ढिगारऱ्या पडून आहेत त्यातच आता सर्व नद्या कोरड्या झाल्या असल्याने मृत मासांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.