सदाशिवनगर येथील श्री परमज्योति अम्माभगवान ध्यानमंदिर मध्ये अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने २५ जून २०२३ रोजी कल्याणोत्सव साजरा करण्यात येणार असून सकाळी आठ वाजता चन्नम्मा चौकातील गणपती मंदिरपासून क्लब रोड,विश्वेश्वरय्यानगर येथून सदाशिव नगर येथील ध्यानमंदिर पर्यंत श्री परमज्योति अम्माभगवान श्रीमुर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यानंतर कल्याणोत्सव म्हणजेच श्री अम्मा आणि श्री भगवानांचा विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर भजन संकीर्तन होईल व दीक्षा देण्यात येईल.
कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक महाआरती आणि महाप्रसाद वितरण करण्यात येईल. तरी भक्तमंडळीनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.