पाऊस लांबल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यामुळे सगळीकडे पावसासाठी प्रार्थना सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समुदायातर्फे पावसासाठी सामूहिक नमाज पठण करण्यात आले. येथील ईदगाह मैदानावर शनिवारी मुस्लिमांनी सामूहिक नमाज अदा केली. बेळगाव उत्तर काँग्रेसचे आमदार आसिफ सेठ व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामूहिक प्रार्थनेदरम्यान अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती अब्दुल अझीझ काझी यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नमाजपठण करण्यात आले. मौलाना आयाज यांनी विशेष प्रार्थना केली. जमलेल्या मुस्लिमांनी ‘अल्लाह, दया कर, पाऊस पडू दे’ अशी आर्त हाक दिली.
पाऊस पडू दे अशी अल्लाकडे आर्त हाक
By Akshata Naik

Previous articleअम्माभगवान सेवा समितीच्या वतीने कल्याणोत्सवाचे आयोजन
Next articleविविध भागातील वीज पुरवठा उद्या खंडित