धावत्या कारला (चार चाकी) वाहनाला आग लागल्याची घटना काल रात्री बेळगाव शहरातील गॅंगवडी नजीक घडली. रात्री कार चालक धर्मनाथ सर्कल कडून हॉटेल रामदेव कडे जात असताना अचानक शॉर्टसर्किटने कारने पेट घेतला यावेळी प्रसंगवधान राखून चालक गाडीतून उतरला. आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग वाढतच गेल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले त्यानंतर अग्निशमनदलाच्या कर्मचाऱ्यांनी पाणी ओतून आग विझविली.ही घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.