काही दिवसांपूर्वी चार्ज फ्रेम झाली होती
गेल्या तीन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या मूर्तीची विटंबना बेंगलोर येथे झाल्यानंतर बेळगाव मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आंदोलन छेडून त्या घटनेचा निषेध करण्यात आला होता.
यावेळी बेळगाव मध्ये दंगल घडवून आणल्याचा आरोप ठेवत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्त्यांवर खोटे दाखल पोलिसांनी दाखल केले होते.त्यातील सात जणांची न्यायालयात आज जबानी पूर्ण झाली आहे . या संदर्भातील दोन खटले आज न्यायालयासमोर आले त्यामध्ये रमाकांत कोंडुस्कर सरिता पाटील मदन बामणे आदींनी धर्मवीर संभाजी महाराज चौक मध्ये प्रक्षेपक भाषण केल्यामुळे दंगल उसळली त्या दंगलीतील कर्नाटक सरकारच्या अधिवेशनासाठी बेळगावात आलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली व शिवनेरी नामक स्टुडिओ फाडण्यात आला या पद्धतीने साठ हजार रुपयांच्या सार्वजनिक व सरकारी मालमत्तेचे नुकसान केले असा आरोप ठेवत खडेबाजार पोलीस ठाण्यात भा द वी कलम 143 147 148 427 109 153 आर डब्ल्यू 149 नवे गुन्हा नोंद करण्यात आला होता.गेल्या काही दिवसांपूर्वी चार्ज फ्रेम झाली होती तर आता न्यायालयात आज सात जणांची जबानी पूर्ण झाली आहे.