गर्भधारणा न होणे ही केवळ स्त्रीचीच समस्या नसून, पुरुष आणि स्त्री दोघांमध्येही वंध्यत्वाचे कारण असू शकते. त्यामुळे भीती न बाळगता आधुनिक टेस्ट ट्यूब बेबी (इन विट्रो फर्टिलायझेशन आयव्हीएफ) उपचार घेतल्यास बाळाचा जन्म शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. वर्षा व्ही. पाटील यांनी केले. होप फर्टिलिटी सेंटरच्यावतीने रविवारी खानापूर येथील शिवस्मारक सभागृहात आयोजित वंध्यत्व उपचार
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रास्ताविक मुकुंद जोशी यांनी केले. डॉ. वर्षा पाटील पुढे म्हणाल्या, वंध्यत्वामुळे त्रस्त दांपत्यांना मूल प्राप्तीसाठी अनेक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्यात टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. यावेळी डॉ. सविता जोशी (कुलकर्णी) यांनी विचार मांडले. खानापूरचे शिक्षणाधिकारी रामप्पा पी., इस्कॉनचे राम प्रभू, मुकुंद जोशी, प्रकाश देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी दांपत्ये आणि नागरिक उपस्थित होते.
टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून वंध्यत्वावर मात शक्य
