सरकारी प्राथमिक मराठी मुला-मुलींची शाळा कसबा नंदगड या शाळेतील २००५-०६ सालच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन तब्बल २० वर्षानंतर शुक्रवार दिनांक २९/०८/२०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
कसबा नंदगड येथे आयोजित ह्या स्नेहमेळाव्यात तब्बल २५ हून अधिक माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी व सर्व गुरूजनांच्या उपस्थितीने अविस्मरणीय ठरला.
प्रारंभी शिक्षक श्री.टि व्ही पाटील सर, श्री.टि आर गुरव सर,श्री.ए बी पुजेर सर, श्री.आर बी.बेटगेरी सर, श्री.पि.एम.शिंदे सर, श्री.ए एम शिंदे सर, श्री.एल आय देसाई सर, श्री.एम एन कांबळे सर,शिक्षिका सौ.भारती पाटील,शिक्षीका सौ.के एन कंग्राळकर, शिक्षिका सौ.संगिता पाटील, शिक्षीका सौ.व्हि एस कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनासह सरस्वती पूजन करण्यात आले.त्यानंतर शाळेच्या मुलींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. स्वागत श्री.टि आर गुरव सर व प्रास्तावित मुख्याध्यापक श्री.ए एम.शिंदे सर यांनी केले.अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमीटीचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत करडी होते त्यानंतर माजी विद्यार्थ्यांतर्फे सर्व गुरुजनांचा शाल,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.टि आर गुरव सर व आदर्श शिक्षीका पुरस्कार प्राप्त सौ.भारती पाटील टिचर यांना सन्मानित करण्यात आले..तसेच भारतीय सैन्यात सेवा बजावत असणाऱ्या २००५-०६ बॅच मधील माजी विद्यार्थी यल्लोजी नागोजी पाटील याला गौरवण्यात आले..
शाळेला भेटवस्तू रूपात संगणक प्रदान करण्यात आला तसेच पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले.. यावेळी श्री डी .एम बागवान सर सी.आर.पी नंदगड विभाग,शाळा सुधारणा कमीटीचे सर्व सभासद,ग्राम पंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते..
सर्व शिक्षकांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या शालेय आठवणींना उजाळा दिला त्यामुळे उपस्थितांमध्ये एक प्रकारचे आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी शिक्षकांनी केलेले कार्य,त्यांचे महत्त्व याबद्दल माजी विद्यार्थी महेंद्र पाटील,भूषण पाटील यांनी विचार मांडून कृतज्ञता व्यक्त केली..
स्नेहमेळावा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कसबा नंदगड व भुत्तेवाडी गावातील माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे मोठे योगदान लाभले.. श्री.एल आय देसाई सरांच्या सुंदर सुत्रसंचलनाने स्नेहमेळाव्यात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते..शिक्षक श्री टि.आर.गुरव सरांच्या आभार प्रदर्शनाने स्नेहमेळाव्याची सांगता झाली..