माळी गल्ली गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आर्थिक मागास कुटुंबांना साड्या तसेच गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मराठा बँकेच्या संचालिका व माजी उपमहापौर रेणू किल्लेकर उपस्थित होत्या. मंडळाच्यावतीने रेणू किल्लेकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्या शकुंतला चौगुले, विद्या लंगरकांडे, स्नेहल भोसले, शगुन खटावकर, देवयानी खटावकर यासह मंडळाचे उपाध्यक्ष भाऊराव चौगुले, साहिल चिकोर्डे उपस्थित होते