कृषी खात्याच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कृषी भाग्य योजनेंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वतता आणण्यासाठी अनेक विशिष्ट उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांना कृषी खात्याकडून अनुदान देण्यात येणार आहे. २०१४-१५ ते २०१९-२० या वर्षात कृषी भाग्य योजना किंवा इतर कोणत्याही विभागीय योजनेचे लाभार्थी असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत, अशी माहिती कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी दिली.