No menu items!
Tuesday, September 16, 2025

३ दिवसांत सार्वजनिक माफी मागा नाहीतर कोर्टात लढाई!राजकुमार टोप्पन्नावर यांची जय किसन मंडळाला कडक चेतावणी!”

Must read

राजकुमार टोप्पन्नावर यांनी जय किसन भाजी मार्केट असोसिएशनच्या संचालकांना ३ दिवसांत सार्वजनिक माफी मागण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा ते, सुजित मुळगुंद, सिदगौडा मोदगी आणि इतरांविरुद्ध केलेल्या खोट्या आरोपांवर मानहानी दावा आणि गुन्हेगारी कारवाई करणार असल्याचे इशारा दिला.

असोसिएशनने छोट्या भाजी विक्रेत्या इस्माईल मुजावर यांच्या मृत्यूसाठी त्यांना जबाबदार धरणे अत्यंत गैरजबाबदारपणाचे असल्याचे टोप्पन्नावर म्हणाले. मुजावर हे आरोग्य उपचार घेत होते आणि BUDA कार्यालयाबाहेर सहकाऱ्यांसमोर कोसळले होते असे त्यांनी सांगितले.

मुजावर यांनी दुकानासाठी आगाऊ रक्कम भरली होती पण शिल्लक रकमेच्या मागणीसाठी त्यांना सतत छळले जात होते, त्यामुळे ते तणावाखाली होते असे टोप्पन्नावर यांनी सांगितले. जय किसन असोसिएशनने २०० हून अधिक सदस्यांना दुकानांचे फक्त तात्पुरते वाटप पत्र दिले आहे, विक्री नोंदणी न झाल्याने या दुकानांचे मालकी हक्क कायदेशीरदृष्ट्या वैध राहतील का असा प्रश्न उपस्थित केला.

सरकारने या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, काही संचालकांनी इतर सहकारी संस्थांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केले असल्याचा आरोप टोप्पन्नावर यांनी केला.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!