नार्वेकर गल्लीत आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू
दिवा पडून अचानक लागलेल्या आगीत
वृद्धेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेदहाच्या सुमारास बेळगावातील नार्वेकर गल्लीत घडली. सुप्रिया बैलूर (वय ७८, रा. नार्वेकर गल्ली) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर वृद्धेची मुलगी अन्यत्र राहत असून त्या एकट्याच घरी होत्या. रात्री दिवा पडल्याने अचानक आग लागली. घरातून धूर येऊ लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी जाऊन पाहिले. यावेळी वृद्धा होरपळल्याचे आढळून आले. गंभीर भाजल्याने त्या जागीच मृत पावल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खडेबाजारचे पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी व अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली