टोकियो मराठी मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरले मराठमोळं कोळी नृत्य सादरीकरण. महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्याच्या संस्कृतीचा ठसा उमटवणारे हे नृत्य प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरले.
हे नृत्य श्रद्धा गजानन पाटील यांच्या कुशल नृत्यदिग्दर्शनाखाली सादर करण्यात आले. समुद्राची लय, कोळी समाजाचा जल्लोष, आणि भक्तिभावाचा उत्साह यांचा संगम या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला. पारंपरिक वेशभूषा, जोशपूर्ण हालचाली, तालबद्ध पावले आणि सामूहिक एकात्मतेतून गणरायाला वाहिलेली ही अनोखी कलांजली होती.
या नृत्यात श्रद्धा गजानन पाटील ,सुशील डी कदम, अभिनाश साहू, अपेक्षा घोलप, तुषार चासकर , नेहा गुप्ता, विक्रांत दयाल, अक्षता कुलकर्णी, आकाश कनसे, सपना कनसे (गायकवाड) यांनी सहभाग घेतला.
परदेशी भूमीत असूनही मराठी बांधवांनी आपल्या परंपरा, संस्कृती व कलेचा ठसा उमटवून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात उत्सव अधिकच अविस्मरणीय केला.